"प्रत्येक पाऊल प्रगतीकडे"
ग्रामपंचायत कोतापूर, राजापूर
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोतापूर गाव हे कोकणच्या निसर्गात वसलेले एक सुंदर, आत्मीय आणि प्रगतीशील गाव आहे. हिरव्यागार डोंगर रांगा , झरे, शेती आणि पारंपारिक कोंकणी संस्कृती साठी ओळखले जाणारे शांतता, साधेपणा आणि एकत्रित जीवन पद्धती हि कोतापूर गावाची खरी ओळख आहे.
कोतापूर गाव शिक्षणाच्या बाबतीतही उल्लेखनीय प्रगती करीत आहे. आतापर्यंत सतत दोन वर्ष ३ मुलींची नासा आणि इस्रो साठी निवड झाली आहेत. तिन्हीही मुली नासा सारख्या ठिकाणी अमिरिकेत जावून आल्या आहेत. गावाचा एकूण साक्षरता दर 98.5% आहे. पुरुष साक्षरता 98.6% तर महिला साक्षरता 98.3% एवढी आहे. गावात प्राथमिक शाळा , अंगणवाडी केंद्र आणि महिला शिक्षण उपक्रम चालवले जातात. अनेक विद्यार्थी आता राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मुंबई सारख्या शहरात उच्च शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षक आणि पालकामधील समन्वयामुळे गावातील मुलांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होत आहे.

Services
कोतापूर गाव शिक्षणाच्या बाबतीतही उल्लेखनीय प्रगती करीत आहे. आतापर्यंत सतत दोन वर्ष ३ मुलींची नासा आणि इस्रो साठी निवड झाली आहेत. तिन्हीही मुली नासा सारख्या ठिकाणी अमिरिकेत जावून आल्या आहेत. गावाचा एकूण साक्षरता दर 98.5% आहे. पुरुष साक्षरता 98.6% तर महिला साक्षरता 98.3% एवढी आहे. गावात प्राथमिक शाळा , अंगणवाडी केंद्र आणि महिला शिक्षण उपक्रम चालवले जातात. अनेक विद्यार्थी आता राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आणि मुंबई सारख्या शहरात उच्च शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षक आणि पालकामधील समन्वयामुळे गावातील मुलांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल होत आहे.होत आहे.
कोतापूर गावातील प्रमुख व्यवसाय शेती आणि बागायती हा आहे. येथील शेतकरी मुख्यत तांदूळ, आंबा, काजू, सुपारी , नारळ आणि भाजीपाला पिकवतात. या प्रमुख व्यवसायामुळे गावाची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. नारळ सुपारीच्या बागानी तर इथले सौंदर्य खुलून आले आहे. पावसाळी हवामान आणि सुपीक माती मुळे गावातील शेतातील उत्पन्न उत्कृष्ट दर्जाचे असते. शेतीबरोबरच काही गावकरी बांधकाम तसेच इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांचा हि सहभाग वाढला असून अनेक महिला बचत गट माध्यमातून सेंद्रिय खत निर्मिती व्यवसायात सहभागी आहेत. सरकारने कर्ज सुविधा उपलब्ध केल्यामुळे महिला आता विविध व्यवसायात उतरल्या आहेत.
आमच्या गावातील कोतापूर आरोग्य मंदिरात तालुका स्तरीय सुविधा उपलब्ध आहेत. आता पर्यंत ७ महिलांच्या प्रसूती आमच्या या खेडेगावात झालेल्या आहेत. आणि त्यासुद्धा विनामूल्य, ना प्रवासाची दगदग , प्रत्येक नातेवाईक आपल्या घरी जाऊन येऊन आपल्या नवीन बालंतीनीचे आनंदाने स्वागत करतात. कोतापूर आरोग्य केंद्राला तालुकास्तरीय उत्तम आरोग्य केंद्र म्हणून मानांकन मिळाले आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या पेशंटची संख्या वाढली आहे.










